Skip to main content

खरंच इंग्रजी चित्रपट बघितल्याने आपली इंग्रजी सुधारते का?


आपण इंग्रजी शिकण्यासाठी कुणालाही सहज विचारलं तर त्या व्यक्तीकडे इंग्रजी सिनेमे पहा हा सल्ला असतोच, आपण जरी ठरविले तरी इंग्रजी सिनेमे समजत नसल्यामुळे ते बघणे सहन होत नाही आणि ते कंटाळवाणे वाटतात जसे आपण शाळेत असताना अभ्यास म्हटल कि जसे वाटायचे तसं.





पण मित्रांनो इंग्रजी सिनेमे बघून खरंच इंग्रजी सुधारते हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो मात्र ते आपण पूर्ण पहायला हवे यासाठी जे आपल्याला आवडेल तेच सिनमे बघणं उत्तम राहील जसे कार्ट्रन सिनेमे किंवा कार्टून चॅनल हे विनाेदी असल्यामुळे आपल्याला मुळीच कंटाळवाणे वाटणार नाही आणि इंग्रजी सिनेमे सबटाइटल सोबत आपल्याला इंग्रजी चॅनलवर बघायला मिळतात त्यामुळे आपले वाचनही होते.


यामघ्ये मित्रांनो काही विनोदी म्हणी, शिव्या, शिष्टाचार अशा गोष्टींचा पुन्हा पुन्हा वापर होतो त्यामुळे त्या आपल्या दिमागात रंगाळतात, आणि कधिकधी तर आपोआप आपल्या तोंडातून हे वाक्य बाहेर पडतात. इंग्रजी शिकण्यासाठी यापेक्षा मजेशिर साधन दुसरे कुठलेच नाही.


मित्रांनो माझ्या अनुभवावरून सांगतो जर तुम्ही इंग्रजी सिनेमे बघाल तर हिंन्दी मराठी सिनेमात तुम्हाला रस कमी वाटेल. पण हे फक्त शिकण्यासाठी करा. आपल्या भाषेला कमी लेखन्यासाठी मुद्दाम नाही.


तर करा सुरूवात, मजा येईल, एक महिना फक्त इंग्रजीच चित्रपट, बाकी काहीच पाहू नका आणि एक महिण्यानंतर मराठी किंवा हिंदी चित्रपट बघून पहा, किती फरक पडतो ते तुम्हीच अजमावा.

---------------------------------------

Welcome 

e4 English Page Group

Story Telling & Topic Presentation Platform
Here You Get Daily English Lessons & Topics. Learn & Practice Your English with Our Expert English Trainers!

इंग्रजी बोलायला शिका ऑनलाइन कुठेही केव्हाही
______________________________________________
e4 Spoken English Classes 

Know More

e4 service
E-mail : e4service4u@gmail.com
8007219237
--------------------------
Start Your Freelancing Career With 
e4 Team
----------------------------------------------------------------
Copyright 2020 © e4 service

Comments

Post a Comment